माणकोली ते मोठागाव रस्त्याला हुतात्मा शांताराम म्हात्रे यांचे नाव द्यावे- यशवंत पाटील आमच्या मागण्यांच्या चर्चेसाठी आम्ही कोणासमोरही बसायला तयार आहोत- कुंदन पाटील
माणकोली ते मोठागाव रस्त्याला हुतात्मा शांताराम म्हात्रे यांचे नाव द्यावे- यशवंत पाटील
आमच्या मागण्यांच्या चर्चेसाठी आम्ही कोणासमोरही बसायला तयार आहोत- कुंदन पाटील
भिवंडी ११(स्व.रा.तो) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय अधिकारी , सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद ठाणे, उपविभागीय अधिकारी भिवंडी, तहसीलदार भिवंडी, अभियांत्रिकी विभाग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नारपोली पोलीस स्टेशन या सर्वांना निवेदन देऊन भिवंडी तालुक्यातील
माणकोली ते डोंबिवली (मोठागाव) या रस्त्याच्या कामाला स्थानिक भूमिपुत्रांनी आपल्या विविध मागण्यांसाठी विरोध करून काम थांबवण्याचा प्रयत्न केला व आज त्याला यश आले आहे, गुरुवार दिनांक ११/५/२००२३ रोजी माणकोली लोढा धाम येथे शांततापूर्ण वातावरणात आंदोलन करून रस्त्याचे काम थांबविण्यात आले, कारण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी पोलीस बंदोबस्त घेऊन सदर काम चालू करण्याचा प्रयत्न केला होता अखेर या कामाला भूमिपुत्रांनी एकत्र येऊन त्यांच्याशी चर्चा करून सदर काम पोलिसांच्या वतीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले, कारण यावेळी उपजिल्हाधिकारी श्रीमती सुचिता भिकाले, व मुख्य भूमापक गैरहजर राहिल्याने उपस्थित भूमिपुत्रांना योग्य ती माहिती अधिकारी वर्गाला देता आली नाही, यावेळी प्रमुख भूमापक कृष्णा रिकामे, राजेंद्र यादव, भूमापक मारुती चोथे प्रज्वल नावडकर, निष्काशीत अधिकारी डी.के.सावंत, ये.जे. चव्हाण, पहारेकरी बाबर व गोसावी, नारपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री शिरोडकर, जय आगरी सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री यशवंत पाटील शिवसेना भिवंडी तालुकाप्रमुख श्री कुंदन तुळशीराम पाटील संस्थेचे संचालक राज बाबू पाटील व आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने स्थानिक भूमिपुत्र उपस्थित होते,
दापोडे सर्वे नंबर ११५ व मानकोली गुरचरण जागा, वेहेळे,वळ, गुंदवली या सर्व गावातील जमिनी गावठाण करण्यासाठी सर्व भूमिपुत्रांनी मागणी केली आहे व माणकोली मोठागाव डोंबिवली हुतात्मा शांताराम म्हात्रे यांचे नाव या रस्त्याला देण्यात यावे अशी मागणी जय आगरी सेवा संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे,
गेल्या अनेक वर्षापासून दापोडे सर्वे नंबर ११५ व माणकोली गुरचरण जागा, वेहेळे,वळ, गुंदवली या सर्व ग्रामपंचायत गावातील जमिनी गावठाण करण्यासाठी सर्व भूमिपुत्रांनी मागणी केली आहे, याबाबतचे सर्व पुरावे आमच्या जवळ आहेत, आमचा रस्त्याला कोणत्याही प्रकारे विरोध नाही, मात्र आमच्या राखीव गुरुचरणी मधून हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन ला जोडला जात आहे याचा आम्हाला अभिमान आहे, मात्र दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चालली आहे त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना घरे बांधायला पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने गावाच्या भविष्यासाठी व घरे बांधण्या साठी पर्यायी जागा असणे आवश्यक आहे , आम्ही अडवलेली जागा जरी रस्त्याला घेतली तरी उर्वरित जागा आम्हाला गावठाण म्हणून घोषित करून मिळावी यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत, जेणेकरून ग्रामस्थांना घरे बांधण्यास अडचण निर्माण होणार नाही त्याचबरोबर या रस्त्याला स्वर्गीय हुतात्मा शांताराम म्हात्रे हे नाव देण्यात यावे अशी मी मागणी या ठिकाणी आज करीत आहे असे यावेळी जय आगरी सेवा संस्थेचे अध्यक्ष
यशवंत पाटील यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरणशी बोलताना सांगितले,
आमचा या रस्त्याला सर्व नागरिकांचा कोणताही विरोध नाही मात्र ही जागा मोजताना चतुर शिमे मध्ये असलेल्या ग्रामपंचायतीना अथवा मालकी हक्क असलेल्या जमीनदारांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता आमची दिशाभूल करून सदरची जागा मोजण्यात आली. माझे या ठिकाणी एवढेच सांगणं आहे जर ही जागा मोजण्यासाठी आम्हाला दिलेले पत्र आपण दाखवावे व पुढील कामाला सुरुवात करावी परंतु अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे पत्र कोणत्याच ग्रामपंचायतीला अथवा जमीन मालकाला मिळाळे नसल्यामुळे
आपण सर्व अधिकारी आम्हा ग्रामस्थांना सरसकट फसविण्याचा प्रयत्न करत आहात त्यामुळे आमचा हा विरोध कायम राहील या कामासाठी आम्हाला कुठेही बोलवा आम्ही सर्व भूमिपुत्र चर्चेसाठी उपस्थित राहू योग्य तो निर्णय घेऊ, शासन नियमानुसार सदर गुरुचरण जागा ही प्रत्येक दहा वर्षात दहा टक्के गावठाण केली जाते, इथे मात्र स्वातंत्र्याची ७५ वर्ष उलटून गेली तरी देखील आमच्या एकाही गावांमध्ये गावठण जागा केलेली नाही,
व जे अधिकारी वर्ग इथे उपस्थित आहेत त्या उपस्थित असलेल्या अधिकारी वर्गांचे फोन वरिष्ठ अधिकारी उचलत नाहीत त्यामुळे पोलीस प्रशासनाला देखील हतबळ व्हावे लागले आहे, असे यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषदेचे सदस्य श्री कुंदन तुळशीराम पाटील यांनी दैनिक स्वराज्य तोरणशी बोलताना सांगितले.
उपस्थित सर्व अधिकारी वर्ग, पोलीस प्रशासन, पदाधिकारी व स्थानिक भूमिपुत्र यांनी या ठिकाणी उपस्थित राहून सदर आंदोलन शांततेत पार पाडले त्यामुळे सर्वांचे आभार संस्थेचे संचालक राज बाबू पाटील यांनी मानले. ...