बांद्रा अजमेर या गाडीचे पालघर स्थानकात जल्लोषात स्वागत मा.श्री.राजेंद्र गावित खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडला स्वागत समारंभ
*बांद्रा अजमेर या गाडीचे पालघर स्थानकात जल्लोषात स्वागत*
पालघर ( एच. लोखंडे ) बांद्रा अजमेर येणारी जाणारी गाडी गाडी नंबर १२९९५ व १२९९६, दिनांक 31 मार्च २०२३ पासून पालघर येथे थांबण्यास सुरुवात झाली तसेच 16209 व 16210 मैसूर अजमेर येणारी जाणारी गाडी आज पासून पालघर येथे थांबू लागली आहे. सदर गाडीचे स्वागत मा. राजेंद्र गावित खासदार साहेब यांनी पालघर रेल्वे स्टेशनवर येऊन केले. या प्रसंगी पश्चिम रेल्वेचे ॲडिशनल डीआरए- श्री. शीलभद्र साहेब, श्री. श्रीनिवास वनगा- पालघर विधानसभा आमदार, श्री.केदार काळे - शिवसेना प्रवक्ते व डी आर यु सदस्य मुंबई, श्री राजेश शहा - पालघर शिवसेना जिल्हाप्रमुख, श्रीम. ज्योतीताई मेहेर- शिवसेना उपनेत्या, श्रीम. वैदेही वाढाण- महिला जिल्हा प्रमुख, तसेच अनेक मान्यवर, प्रवासी व रेल्वे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
अजमेर व राजस्थान येथे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची पालघर रेल्वे स्थानकात, या वेळेस मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती. या गाड्यांचा उपयोग अजमेर तसेच पुष्कर व राजस्थानला जाण्यासाठी होणार आहे तसेच मैसूर अजमेर गाडीचा उपयोग अजमेर, अबू. पुणे आदी जाण्यासाठी होणार आहे. याप्रसंगी, मा. राजेंद्र गावित साहेब म्हणाले माझ्या मतदार संघातील सर्व रेल्वे स्टेशनवर, नायगाव पासून घोलवड पर्यंत मी सुविधा देण्याचा सतत प्रयत्न करत असतो. तसेच दक्षिण भारतात, उत्तर प्रदेशात व राजस्थान व कोकण भागात जाणाऱ्या गाड्यांचा थांबा पालघरला मिळावा म्हणून प्रयत्न करत आहे .तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या समस्या मला माहित आहे सकाळी डहाणून सुटणारे गाडी नंबर, सात पाचशे लोकल व रात्री दुसऱ्या फेरीनंतर विरारला जाणारी लोकल. मधल्या वेळेतील चर्चगेट लोकल किंवा विरारला असलेल्या लोकल बोरिवली अंधेरी पर्यंत नेण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. सदर लोकल व गाड्या कामासाठी मला मा. रेल्वेमंत्री व मा. राज्यमंत्री रेल्वे तसेच रेल्वेच्या अधिकाऱ्याने सहकार्य केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो .