Posts

एस के पाटील विद्यालय माकुणसार, व्दारा सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात यावी. माजी विद्यार्थी संघाची तीव्र मागणी !

एस के पाटील विद्यालय माकुणसार, व्दारा सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात यावी.  माजी विद्यार्थी संघाची तीव्र मागणी* !  दिनांक १५ मे.  सफाळे ( एच. लोखंडे ) सर्वोदय एज्युकेशन सोसायटी मुंबई व्दारा संचलित, एस. के. पाटील विद्यामंदीर, माकुणसार ता. जि. पालघर येथील माजी विद्यार्थी यांनी एस. के पाटील विद्यालयात मुख्याध्यापक, सर्वोदय एज्युकेशन सोसायटी मुंबई -  संचालक, यांना विनंती वजा लेखी निवेदन दिले आहे की, आपल्या संस्थेच्या मार्फत, अनेक वर्षांपासून शालेय विद्यार्थी यांना मराठी भाषेत दर्जेदार, उत्तम शिक्षण देऊन अनेक विद्यार्थी यांचे भवितव्य घडविले. त्यामुळे अनेक क्षेत्रात माकुणसार येथील विद्यार्थी यांनी आपल्या शाळेला नाव लौकिक मिळवून दिला आहे.            आता बदलत्या काळानुसार शिक्षण शेत्र बदल घडत असून, काळाची गरज ओळखून, आपल्या माकुणसार विद्यालयात सुद्धा नवीन शालेय वर्षा पासून, सेमी इंग्रजी चे शिक्षण सुरू करण्यासाठी आम्ही विद्यार्थी संघ आपणास या अर्जासोबत विनंती करीत आहोत. आपल्या परिसरातील राहणारे पालक वर्ग, आपल्या पाल्यांना इंग्रजी भाषेत ज्ञान मिळण्यासाठी, इतर ठिकाणी असलेल्या  *सेमी इंग्

जिल्हा परिषद पालघर येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी

Image
*जिल्हा परिषद पालघर येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी*  पालघर (प्रतिनिधी)जिल्हा परिषद पालघर येथे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा  गंगाधर निवडुंगे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले हे शिवाजी महाराज यांचे चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. छत्रपती म्हणजे छत्र धारण करणारा, म्हणजेच सदैव प्रजेला मदत करणारे व दुःख वेचून घेनारा, प्रजेच्या संरक्षण, पालन पोषणाची जबाबदारी व काळजी घेणारा. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले होते.    अशा धर्मवीर,स्वराज्य रक्षक, यांची जयंती आज साजरी करण्यात आली.    प्रसंगी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

काव्य किरण मंडळाचा ५१ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न!

Image
काव्य किरण मंडळाचा ५१ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न! कल्याण (स्व.रा.तो) शनिवार दि. १३ मे २०२३ रोजी कल्याण येथील अभिनव विद्यामंदिराच्या डॉ.आनंदी गोपाळ सभागृहात काव्य किरण मंडळ कल्याण या मंडळाचा  ५१ वा वर्धापन दिन व सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ मंडळाचे विद्यमान अध्यक्ष तथा ज्येष्ठ कवी प्रवीण देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या आनंद-उत्साहात संपन्न झाला. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ख्यातनाम कवी हेमंत राजाराम हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली.  कुमारी श्रीनीधी वैष्णव हिने सुमधूर आवाजात शारदावंदन सादर केले. मान्यवरांच्या शुभहस्ते काव्य किरण मंडळाच्या ५० वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेणारी सुवर्ण गाथा – मे १९७३ ते मे २०२३ ही  स्मरणिका प्रकाशित करण्यात आली.  मंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्या सांजवात या कविता संग्रहाचे लोकार्पण तर विजय चिपळूणकर यांच्या वृत्तांकीत या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. वृत्तांकीत या काव्य संग्रहावर सुखदा कोरडे, स्वाती नातू, दया घोंगे व ज्योत्स्ना चिपळूणकर यांनी तर सांजवात या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'शासन आपल्या दारी' अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ

Image
*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  'शासन आपल्या दारी' अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ* *'शासन आपल्या दारी' अभियान अधिक व्यापक करणार-मुख्यमंत्री* सातारा दि.१३- शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या 'शासन आपल्या दारी' अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (मरळी) येथे करण्यात आला. नागरिकांना मोठ्या प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी हे अभियान अधिक व्यापक करण्यात  येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी दिली. दौलतनगर येथील श्रीमती विजयादेवी देसाई विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय परिसरात आयोजित या कार्यक्रमाला   उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, उद्योगमंत्री उदय सामंत,  उत्पादन शुल्क मंत्री  शंभुराज देसाई  आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयात जावे लागते. त्यामुळे अनेकजण योजनांच्या लाभापासून वंच

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रोजगार हक्क मेळावा संपन्न महिला कुस्तीपटूशोषक ब्रिजभूषण सिंह यांस अटक करण्यासाठी घेतली सह्यांची मोहिम

Image
*विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रोजगार हक्क मेळावा संपन्न*  *महिला कुस्तीपटूशोषक ब्रिजभूषण सिंह यांस अटक करण्यासाठी घेतली सह्यांची मोहिम* मुंबई (गुरूदत्त वाकदेकर) : प्रभादेवी येथील भुपेश गुप्ता भवनमधे काल दि. १३ मे रोजी मुलभूत अधिकार संघर्ष समिती, परिवर्तन झोपडपट्टी विकास परिषद, होश मे आवो अभियान, शिक्षक लोकशाही आघाडी (TDS), प्रबोधन युवासंघ, बृहन्मुंबई भाडेकरू परिषदेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त रोजगार हक्क मेळावा घेण्यात आला.      भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होऊन देखील लाखो तरुण बेरोजगार आहेत. त्यांत इंजिनिअर, शिक्षक, डॉक्टर, नर्सेस यांची कित्येक पदे रिक्त आहेत. बीए, बीएससी, एम एएम, झालेले बेरोजगार तरूण वणवण फिरत आहेत. यामुळे त्यांना नैराश्य येत आहे. त्यातून काहीजण आत्महत्या करताना आजूबाजूला दिसत आहेत. तेंव्हा त्यांना सरकारने काम देणे गरजेचे आहे. रोजगार हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. त्यांना काम द्या, नाहीतर तोपर्यंत बेकार भत्ता देण्यात यावा. अशी मागणी या मेळाव्यात करण्यात आली. रोजगाराचा भूलभूत

दिल्ली प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ; पंजाब मोठ्या विजयासह सहाव्या स्थानावर

Image
*दिल्ली प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ; पंजाब मोठ्या विजयासह सहाव्या स्थानावर* मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२३ च्या ५९ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला शनिवारी (१३ मे) पंजाब किंग्जविरुद्ध दणदणीत पराभव स्वीकारावा लागला.  दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पंजाबने त्यांना ३१ धावांनी पराभूत करून प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या.  यासोबतच दिल्लीचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला.  त्यांचे १२ सामन्यांत आठ गुण आहेत.  बाकीचे दोन सामने जिंकले तरी त्याचे फक्त १२ गुण होतील.  अशा स्थितीत त्यांना पुढील फेरी गाठता येणार नाही.  दुसरीकडे पंजाबने या विजयासह गुणतालिकेत झेप घेतली आहे.  त्यांना १२ गुण मिळाले असून ते सहाव्या स्थानावर पोहोचले आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  पंजाबने २० षटकांत सात गडी गमावून १६७ धावा केल्या.  प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ २० षटकांत ८ गडी गमावून १३६ धावाच करू शकला. पंजाबकडून प्रभसिमरन सिंगने सर्वाधिक १०३ धावा केल्या.  त्याचे हे आयपीएलमधील पहिले शतक आहे. आयपीएलच्या चालू

लखनौचा हैदराबादवर विजय; प्लेऑफच्या आशा अबाधित

Image
*लखनौचा हैदराबादवर विजय; प्लेऑफच्या आशा अबाधित* मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२३ च्या ५८ व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा सात गडी राखून पराभव केला.  नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २० षटकांत ६ गडी गमावून १८२ धावा केल्या.  हेनरिक क्लासेनने २९ चेंडूत ४७ धावा केल्या आणि अब्दुल समदने २५ चेंडूत नाबाद ३७ धावा केल्या.  प्रत्युत्तरात लखनौने १९.२ षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले.  युवा प्रेरक मांकडने ४५ चेंडूत ६४ धावांची नाबाद खेळी केली.  त्याचवेळी निकोलस पूरनने १३ चेंडूत ४४ धावा केल्या.  मार्कस स्टॉइनिसने २५ चेंडूत ४० धावांची खेळी केली. या विजयासह लखनौचा संघ १२ सामन्यांत सहा विजय आणि पाच पराभवांसह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.  त्याला १३ गुण आहेत.  चेन्नईविरुद्धचा सामना पावसाने वाहून गेला.  त्याचबरोबर सनरायझर्स हैदराबादचे ११ सामन्यांत आठ गुण आहेत.  या संघासाठी प्लेऑफचा मार्ग अत्यंत कठीण झाला आहे.  त्यांना इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.  हैदराबादने ११ पैकी चार सामने जिंकले आहेत, तर ७ सामने गमावले आहेत.  लखनौचे पुढील दोन सामने