सफाळे डोंगरी येथील साईसदन मध्ये राहत्या घरात महिलेची आत्महत्या !
सफाळे डोंगरी येथील साईसदन मध्ये राहत्या घरात महिलेची आत्महत्या !
सफाळे ( एच. लोखंडे ) दिनांक ३० मे २०२२ रोजी वेळ सकाळी अंदाजे ९ वाजेच्या पुर्वी सौ. सरस्वतीदेवी विमलकांत मिश्रा वय वर्षे ४० राहणार साईसदन डोंगरी सफाळे पुर्व ता,जि पालघर. या महिलेने आपल्या रहात्या घरातील फ्रिजचे वरिल बाजूस छतास असलेल्या लोखंडी पाईपला, नाॅयलाॅन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या बद्दल रोनककुमार - बबलू विमलकांत मिश्रा वय वर्षे १९ , राहणार साईसदन डोंगरी सफाळे खबर दिली असताना, घटनास्थळी जाऊन रिजवाना केकरी महिला पोलीस उपनिरीक्षक सफाळे पोलीस ठाणे यांनी पंचनामा करून मृताचे पी. एम. करण्यासाठी सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले.
सदर घटनेची सफाळे पोलीस ठाणे ता,जि पालघर येथे अपघाती मृत्यू रजि. नंबर ०८ / २०२२ व सी. आर. पी. सी. १७४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून. सदर मृत्यू बाबत संशयाचा प्रकार, कोणा विरध्द काही एक तक्रार नाही.
मा. वरिष्ठ पोलिस अधिकारी पालघर, यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रभारी पोलीस अधिकारी सफाळे पोलीस ठाणे. श्री एस एफ गावई - स. पो. निरीक्षक यांच्या निरीक्षणाखाली तपासी अंमलदार श्री बोरसे पुढील तपास करीत आहे.