लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या कोकण विभागीय संघटकपदावर ज्येष्ठ पत्रकार श्री पंकज राऊत. बोईसर

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या कोकण विभागीय संघटकपदावर ज्येष्ठ पत्रकार श्री पंकज राऊत. बोईसर
बोईसर ः लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या कोकण विभागाच्या संघटन तथा संपर्कप्रमुख पदावर दै. लोकमत मुंबई आवृत्तीचे ज्येष्ठ पत्रकार श्री पंकज राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
श्री. पंकज राऊत हे गेल्या 25 वर्षापासून दै. लोकमतच्या मुंबई आवृत्तीचे कोकण विभागात काम करीत आहेत. सध्या ते पालघर, बोईसर, डहाणू परिसरात औद्योगिक व सामाजिक क्षेत्रात पत्रकारीतेमध्ये सक्रिय आहेत. यापूर्वी त्यांनी दै. तरुण भारतमधूनही आपल्या अभ्यासू पत्रकारीतेचा सक्रिय ठसा उमटविलेला असून कोकण विभागात सामाजिक क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्येही ते क्रियाशील आहेत. 
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची भेदातीत व पारदर्शक वाटचाल आणि नाविण्यपूर्ण सातत्त्याच्या उपक्रमांमुळे त्यांनी या पत्रकार महासंघाचे सभासदत्व स्विकारले असून त्यांचा कोकण विभागातील प्रभाव पाहता लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्टीय-अध्यक्ष श्री संजय एम. देशमुख यांनी त्यांची कोकण विभागाच्या संघटन तथा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. याबाबत मनोगत व्यक्त करताना श्री. पंकज राऊत यांनी कोकण विभागात संघटन मजबूत करून महासंघाची नाविण्यापूर्ण बांधणी करण्याचे अभिवचन दिले. त्यांच्या या नियुक्तीबध्दल त्यांचे  ह्या संघटनेतील  श्री आशाद शेख,श्री जगधिश करोतीया, संतोष राणे,विठोबा मराठे ,संपत उजाला तसेच सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Popular posts from this blog

बांद्रा अजमेर या गाडीचे पालघर स्थानकात जल्लोषात स्वागत मा.श्री.राजेंद्र गावित खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडला स्वागत समारंभ

कै. जनार्दन सदाशिव तांबे - स्वतंत्र सैनिक, यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ होतकरू/ गरीब/गरजू विद्यार्थ्यांनीना सायकल वाटस संपन्न