दुर्गा भागवत – एक शोध; २० मे रोजी व्याख्यान, लघुपटाचे आयोजन

*दुर्गा भागवत – एक शोध; २० मे रोजी व्याख्यान, लघुपटाचे आयोजन*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार दिनांक २० मे रोजी संध्याकाळी साडे पाच वाजता “दुर्गा भागवत - एक शोध” हे व्याख्यान आणि लघुपट असा कार्यक्रम केंद्राच्या गोखले सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे.
कै. दुर्गाबाई भागवत यांचे वैविध्यपूर्ण साहित्यप्रकारात मोठे योगदान आहे. श्रीमती अंजली किर्तने या दुर्गाबाईंवर माहिती देतील. नंतर त्यांनी स्वतः तयार केलेला दुर्गाबाईंवरील लघुपट दाखवण्यात येईल. या कार्यक्रमाला डॉ. सुधा जोशी यांनी आर्थिक सहाय्य केले असून केंद्रातर्फे रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Popular posts from this blog

बांद्रा अजमेर या गाडीचे पालघर स्थानकात जल्लोषात स्वागत मा.श्री.राजेंद्र गावित खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडला स्वागत समारंभ

सफाळे डोंगरी येथील साईसदन मध्ये राहत्या घरात महिलेची आत्महत्या !

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या कोकण विभागीय संघटकपदावर ज्येष्ठ पत्रकार श्री पंकज राऊत. बोईसर