सफाळे परिसर समिती व्दारा, ग्रामीण रुग्णालयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

*सफाळे परिसर समिती व्दारा, ग्रामीण रुग्णालयासाठी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन*
दिनांक १२ मे
सफाळे (एच.लोखंडे )  सफाळे ता. जि. पालघर येथे सर्व सोयीने युक्त असे सुसज्ज ग्रामीण रुग्णालयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक ११ मे २०२३ रोजी सफाळे परिसर संघर्ष समितीचे धरणे आंदोलन  सुरू करण्यात आले होते. सफाळे परिसरात सुसज्ज सर्व सोईउपयुक्त ग्रामीण रुग्णालय नसल्याने उपचारा अभावी अनेक रूग्णांनाचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या अनुषंगाने सफाळे परिसर संघर्ष समिती मागील ३ वर्षापासून पाठपुरावा करीत असुन, आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले. 
        सफाळे पुर्व पश्चिम भागातील  परिसरात अंदाजे ४०- ते ५ ० छोटी मोठी गावे पाडे वस्त्या असुन अंदाजे  एक ते दिड लाख लोकसंख्येचा भार असलेल्या सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्र  पडत असून वेळोवर उपचार मिळत नाही.
शासनाकडून होणारा अपूर्ण औषध पुरवठा, ऑक्सिजनची सेवा नसणे,या अभावामुळे रूग्णांनाचे  हाल होत आहेत.
          यासाठी सफाळे येथे सुसज्ज रुग्णालय होणे  ही काळाची गरज असुन, सफाळे परिसरात ग्रामीण रुग्णालयासाठी सफाळे परिसर संघर्ष समिती व्दारा जिल्हा अधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले असताना, आंदोलनच्या ठिकाणी सौ. भारती कामडी- माजी जिल्हा परिषद अध्यक्षा व सदस्या भारती कामडी, शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी तसेच श्री.जतिन कदमसर - सामाजिक कार्यकर्ते - सफाळे, यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला होता. आरोग्य विभागामार्फत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय बोदाडे यांनी आंदोलन कर्त्यांची भेट देऊन शासन दरबारी पाठपुरावा करु असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर उपजिल्हाधिकारी डॉ किरण महाजन यांची शिष्टमंडळाने भेट देऊन, त्यांना मागण्या संदर्भात लेखी निवेद देण्यात आले. या वेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष भरत काळे, पदाधिकारी - मंगेश घरत, नचिकेत पाटील, अंजली कुडु, कार्तिकी चुरी, सुनील  निमकर, रामकृष्ण पाटील, आदी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, हितचिंतक, मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. श्री. संजय बोदाडे - जिल्हा शल्य चिकित्सक पालघर यांनी आंदोलन कर्ते यांना शासन दरबारी आपल्या मागण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले असताना, आंदोलन स्थगित करण्यात आले.

Popular posts from this blog

बांद्रा अजमेर या गाडीचे पालघर स्थानकात जल्लोषात स्वागत मा.श्री.राजेंद्र गावित खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडला स्वागत समारंभ

सफाळे डोंगरी येथील साईसदन मध्ये राहत्या घरात महिलेची आत्महत्या !

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या कोकण विभागीय संघटकपदावर ज्येष्ठ पत्रकार श्री पंकज राऊत. बोईसर