शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळा मार्फत. थकीत मुद्दल व व्याज एकरक्कमी भरून योजनेचा लाभ ३१में पर्यंत घ्यावा

*शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळा मार्फत.   थकीत मुद्दल व व्याज एकरक्कमी भरून योजनेचा लाभ ३१में पर्यंत घ्यावा*

...पालघर दि. 9  : शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ मर्या. मुंबई यांच्या जिल्हा कार्यालय पालघर मार्फत विविध कर्ज योजनेंतर्गत जिल्ह्यातील इतर मागस प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराकरिता अल्प व्याज दराने कर्ज वितरीत करण्यात आले आहे.
...जिल्ह्यातील थकीत कर्ज रक्कम असलेल्या लाभार्थ्यांना जाहिर आवाहन करण्यात येते की, महामंडळाकडून
घेतलेल्या कर्जाची मुदत संपलेल्या लाभार्थीना महामंडळाकडून घेतलेल्या कर्जावर संपूर्ण थकीत व्याज रक्कमेवर लाभार्थ्यांना ५०% सवलत देण्यात येणार आहे. त्याचा लाभ घेऊन सर्व संबंधित लाभार्थ्यांनी थकीत मुद्दल व व्याज एकरकमी परतावा (One Time Settlement) योजनेचा दि. ३१में पर्यंत लाभ घेऊन कर्ज खाती बंद करुन कर्जमुक्त व्हावे तसेच कायदेशीर कार्यवाही टाळावी. याबाबत शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक,आर. एम. मेश्राम,  यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ  जिल्हा पालघर यांनी केले आहे.

Popular posts from this blog

बांद्रा अजमेर या गाडीचे पालघर स्थानकात जल्लोषात स्वागत मा.श्री.राजेंद्र गावित खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडला स्वागत समारंभ

सफाळे डोंगरी येथील साईसदन मध्ये राहत्या घरात महिलेची आत्महत्या !

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या कोकण विभागीय संघटकपदावर ज्येष्ठ पत्रकार श्री पंकज राऊत. बोईसर