" प्रकल्प बाधित शेतकरी, जमीन मालक यांच्या समस्या सोडविण्या संदर्भात पालघर जिल्हाधिकारी सह बैठकीचे आयोजन " *मा. श्री. राजेंद्र गावीत - खासदार पालघर*

" प्रकल्प बाधित शेतकरी, जमीन मालक यांच्या समस्या सोडविण्या संदर्भात पालघर जिल्हाधिकारी सह बैठकीचे आयोजन " 
*मा. श्री. राजेंद्र गावीत - खासदार पालघर*

११ मे
पालघर ( एच. लोखंडे ) पालघर जिल्ह्यातील मुंबई अहमदाबाद अतिजलद रेल्वे, ( बुलेट ट्रेन ) रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधीत शेतकरी, जमीन मालक, नागरिक व त्यांचे प्रतिनिधी यांच्या न्याय हक्कासाठी. त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयात पालघर येथे बैठक आयोजित करण्यात येण्यासाठी मा. श्री. राजेंद्र गावीत - खासदार पालघर यांनी दिनांक ३ मे २०२३ रोजी जिल्हाधिकारी पालघर यांना लेखी (पत्र ) दिलेले निवेदन. 
                 त्या अनुषंगाने 
*दिनांक  १२ मे २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, रूम नंबर २०१ , समिती सभागृह दालनात, दुपारी ३ च्या वेळेत* बुलेट ट्रेन प्रकल्प बाधित व रिलायन्स प्रकल्प बाधित शेतकरी, जमीन मालक, नागरिक यांच्या, मागील अंदाजे दोनदा महिन्या पासून करण्यात येणारा पाठपुरावा व काही स्थानिक भूमिपुत्रांवर झालेल्या, अन्यायाला  वाचा फोडण्यासाठी मिळत असलेले सहकार्य व पुढील वाटचाल यशस्वी करण्यासाठी सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 
           सदर बैठकीत मा. श्री. राजेंद्र गावीत - खासदार पालघर, सह  मा. श्री.गोविंद बोडके जिल्हाधिकारी पालघर, श्री. कुणाला सुरेश पाटील -  ( D.D.C.M.C.Member ) ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार तसेच सदर विभागातील सक्षम अधिकारी वर्ग उपस्थित राहणार असल्याने, त्यावेळी तेथे उपस्थित बाधित शेतकरी, जमीन मालक, नागरिक यांचे प्रलंबित असणारे प्रश्न सोडविण्या साठी यशस्वी प्रयत्न करण्यात येतील. तरी प्रकल्प बाधित यांची उपस्थिती लक्षणीय आहे.

Popular posts from this blog

बांद्रा अजमेर या गाडीचे पालघर स्थानकात जल्लोषात स्वागत मा.श्री.राजेंद्र गावित खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडला स्वागत समारंभ

सफाळे डोंगरी येथील साईसदन मध्ये राहत्या घरात महिलेची आत्महत्या !

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या कोकण विभागीय संघटकपदावर ज्येष्ठ पत्रकार श्री पंकज राऊत. बोईसर