उत्कृष्ठ पेसा ग्रामपंचायतीची निवड करण्यासाठी 18 मे पर्यंत अर्ज सादर करावे
*उत्कृष्ठ पेसा ग्रामपंचायतीची निवड करण्यासाठी 18 मे पर्यंत अर्ज सादर करावे*
पालघर (प्रतिनिधी)दि. 11 : जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा या तालुक्यातील मागील 3 वर्षात पेसा निधीची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या उत्कृष्ठ पेसा ग्रामपंचायतीची निवड करण्यासाठी पेसा ग्रामपंचायतीमधुन प्रकल्प स्तरावर 10 ग्रामपंचायतींची निवड करण्यासाठी विवरण पत्रासह 18 मे पर्यंत अर्ज सादर करावे. विवरण पत्र प्रकल्प कार्यालयात नि : शुल्क उपलब्ध आहे.
*अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सुचना पुढील प्रमाणे*
अर्ज प्रकल्प कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहील, अर्जावर ग्रामसेवक व सरपंच यांची स्वाक्षरी असणे बंधनकारक राहील, ग्रामपंचायत पेसा क्षेत्रातील असणे आवश्यक आहे, अर्जासोबत विवरण पत्र पुर्ण भरणे आवश्यक आहे अन्यथा अर्ज बाद करण्यात येईल, प्रकल्प स्तरावरुन निवड समितीमार्फत निवड झालेल्या 10 ग्रामपंचायतींची नावे विभागीय स्तरावर / अपर आयुक्त स्तरावर सादर करण्यात येतील व तेथे निवड समितीमार्फत निवड झालेल्या पेसा ग्रामपंचायतीला 10.00 लक्ष रुपयाचे प्रोत्साहनपर निधी, प्रशस्तीपत्र आणि पदक प्रदाण करण्यात येईल, तसेच विभागीय स्तरावरुन निवड झालेल्या पेसा ग्रामपंचायतींची नावे राज्य स्तरावर सादर करण्यात येतील व तेथे निवड समितीमार्फत निवड करण्यात येणाऱ्या पेसा ग्रामपंचायतीकडुन रु.15.00 लक्षाचा आराखडा मागविण्यात येवुन सदर आराखडयास राज्यस्तरीय समितीव्दारा मंजुरी प्रदान करण्यात येईल. असे जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी आयुष सिंह यांनी कळविलेआहे.