आदिवासी कलाकार मेळावा 16 में रोजी
*आदिवासी कलाकार मेळावा 16 में रोजी*
पालघर (प्रतिनिधी)दि 11 : डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , अंतर्गत असणाऱ्या आदिवासी कलाकारांनी तयार केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने भारतीय जनजातीय सहकारी विपणन विकास संघ ( TRIFED ) यांच्या मार्फत येत्या 16 में रोजी “ आदिवासी कलाकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे .
. सदर मेळाव्यामध्ये खरेदी समितीकडून निवडण्यात आलेल्या आदिवासी कलेच्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंची TRIBES INDIA यांच्यामार्फत खरेदी करण्यात येणार आहे . तरी सदर मेळाव्यामध्ये सहभागी होण्यास इच्छुक असणाऱ्या कलाकारांनी दि .१४.०५.२०२३ पर्यंत. डहाणू, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय , येथे नावनोंदणी करावी . ●
*नावनोंदणी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे*
कलाकार अनुसूचित जमातीचा असावा ,कलाकार अनुसूचित जमातीचा असल्याचा जातीचा दाखला व बँक पासबुक झेरॉक्स सोबत असणे आवश्यक आहे, एका कुटुंबातील एकच सदस्याला सहभागी होता येईल , तसेच एका बचत गटाचा एक प्रतिनिधी सहभाग घेऊ शकेल . • एका बाजूचा प्रवास खर्च व जेवण संस्थेकडून पुरविण्यात येईल कलाकारांनी मेळाव्यास येताना तयार केलेल्या आदिवासी कलेच्या वस्तू सोबत आणाव्यात असे आवाहन डहाणू प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी संजिता महापात्र यांनी केले.