कै. जनार्दन सदाशिव तांबे - स्वतंत्र सैनिक, यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ होतकरू/ गरीब/गरजू विद्यार्थ्यांनीना सायकल वाटस संपन्न
*कै. जनार्दन सदाशिव तांबे - स्वतंत्र सैनिक, यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ होतकरू/ गरीब/गरजू विद्यार्थ्यांनीना सायकल वाटस संपन्न*
पालघर ( एच. लोखंडे ) दिनांक १२ एप्रिल २०२३ रोजी माहिम ता. जि. पालघर येथील श्री. किरण जनार्दन तांबे यांनी आपले वडील कै. जनार्दन सदाशिव तांबे *स्वतंत्र सैनिक* यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, भुवनेश कीर्तने विद्यालय माहिम ता. जि. पालघर यांच्या विद्यालयात शैक्षणिक शिक्षण घेत असलेल्या परंतु शाळेपासून अंदाजे दोन ते तीन किलोमीटरहून अधिक अंतरावर राहत असलेल्या गरीब/ गरजू/होतकरू मुलींना शैक्षणिक शिक्षण घेत असताना, येत असलेल्या आर्थिक परिस्थिती मुळे, शाळेत नियमितपणे वेळेवर पोहचून, शिक्षण घेणे सुलभ होण्यासाठी मान्यवर यांच्या हस्ते, भुवनेश कीर्तने विद्यालयातील अंदाजे ७० ( सत्तर ) विद्यार्थीनीना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले.
सदर सायकल वाटप कार्यक्रमांचे अध्यक्ष म्हणून श्री. अजय ठाकूर - माहिम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हे व्यासपीठावर विराजमान होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री. किरण जनार्दन तांबे - सामाजिक कार्यकर्ते तथा सायकली देणारे दाते, तर विषेश अतिथी म्हणून श्री. दिपक करबट- सरपंच - ग्रामपंचायत माहीम ता. जि. पालघर त्याच प्रमाणे श्री. नरेंद्र पाटील - शिक्षण संस्थेचे मुख्य विश्वस्त, श्री. विजय वि. पाटील- विश्वस्त, श्री. भालचंद्र मुकुंद राऊत सर, सौ. निलम राऊत - उपाध्यक्ष, श्री. संजय पाटील - सदस्य, श्री. सुधीर गवादे- मुख्याध्यापक, सौ. किरण तांबे, सौ. माधवी मेहेर- माजी सरपंच, विद्यालयातील शिक्षक, लाभार्थी विद्यार्थी आदी बहुसंख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख अतिथी श्री. किरण तांबे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, समाजातील विद्यार्थीनींनी शिक्षणापासून, वंचित न राहता आपल शिक्षण पूर्ण करून, आपल्या आई वडिलांना सहाय्यभूत व्हावे, हे माझ्या वडिलांचे स्वप्न होते. ते पूर्ण व्हावे या उद्देशाने सदर सायकली वाटप अभिनव उपक्रम राबवला आहे.