एस के पाटील विद्यालय माकुणसार, व्दारा सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात यावी. माजी विद्यार्थी संघाची तीव्र मागणी !

एस के पाटील विद्यालय माकुणसार, व्दारा सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात यावी. 
माजी विद्यार्थी संघाची तीव्र मागणी* ! 
दिनांक १५ मे. 

सफाळे ( एच. लोखंडे ) सर्वोदय एज्युकेशन सोसायटी मुंबई व्दारा संचलित, एस. के. पाटील विद्यामंदीर, माकुणसार ता. जि. पालघर येथील माजी विद्यार्थी यांनी एस. के पाटील विद्यालयात मुख्याध्यापक, सर्वोदय एज्युकेशन सोसायटी मुंबई -  संचालक, यांना विनंती वजा लेखी निवेदन दिले आहे की, आपल्या संस्थेच्या मार्फत, अनेक वर्षांपासून शालेय विद्यार्थी यांना मराठी भाषेत दर्जेदार, उत्तम शिक्षण देऊन अनेक विद्यार्थी यांचे भवितव्य घडविले. त्यामुळे अनेक क्षेत्रात माकुणसार येथील विद्यार्थी यांनी आपल्या शाळेला नाव लौकिक मिळवून दिला आहे. 
          आता बदलत्या काळानुसार शिक्षण शेत्र बदल घडत असून, काळाची गरज ओळखून, आपल्या माकुणसार विद्यालयात सुद्धा नवीन शालेय वर्षा पासून, सेमी इंग्रजी चे शिक्षण सुरू करण्यासाठी आम्ही विद्यार्थी संघ आपणास या अर्जासोबत विनंती करीत आहोत. आपल्या परिसरातील राहणारे पालक वर्ग, आपल्या पाल्यांना इंग्रजी भाषेत ज्ञान मिळण्यासाठी, इतर ठिकाणी असलेल्या  *सेमी इंग्रजी* माध्यमातून शिक्षण देणाऱ्या शाळा मध्ये प्रवेश घेत असल्याने, आपल्या विद्यालयाची शालेय विद्यार्थी यांची पट संख्या कमी होते आहे. असे निदर्शनास आले आहे. 
           यासंदर्भात विचार करून आपल्या माकुणसार येथील विद्यालयात, चालू शैक्षणिक वर्षाच्या पदार्पणात सेमी इंग्रजी माध्यमातून इयत्ता ५ वी पासुन शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा. हि विनंती. 
         सदर या विषयांच्या अनुषंगाने शिक्षण अधिकारी पालघर यानाही, या संदर्भात आम्ही लेखी निवेदन सादर केलेले आहे.  सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात साठी,  आपणास , आम्ही एस के पाटील विद्यामंदिर माजी विद्यार्थी संघ माकुणसार पुर्ण पणे सहकार्य करणार आहे. या आशयाचे लेखी निवेदन  श्री. नितीन ह. राऊत- अध्यक्ष, श्री. पंकज अ. म्हात्रे- उपाध्यक्ष, सौ. साधना शि. ठाकुर - उपाध्यक्षा, श्री. - संदिप म्हात्रे यांनी संचालक, मुख्याध्यापक, शिक्षण अधिकारी यांना दिले आहे. 
       शैक्षणिक शेत्रातील बदलत्या    धोरणामुळे आपणही शैक्षणिक शेत्रात बदल करावे हि पंचक्रोशीतील जनतेची मागणीनुसार बदल करावे जनतेची मागणी मंजूर करावी.

Popular posts from this blog

सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात परदेशी भाषा शिकण्याची सुवर्णसंधी!

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या कोकण विभागीय संघटकपदावर ज्येष्ठ पत्रकार श्री पंकज राऊत. बोईसर

परळ विभागातील सुप्रसिद्ध रिटेल आणि रेनबो यांनी केला स्वातंत्र्यदिन साजरा