काव्य किरण मंडळाचा ५१ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न!

काव्य किरण मंडळाचा ५१ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न!
कल्याण (स्व.रा.तो)


शनिवार दि. १३ मे २०२३ रोजी कल्याण येथील अभिनव विद्यामंदिराच्या डॉ.आनंदी गोपाळ सभागृहात काव्य किरण मंडळ कल्याण या मंडळाचा  ५१ वा वर्धापन दिन व सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ मंडळाचे विद्यमान अध्यक्ष तथा ज्येष्ठ कवी प्रवीण देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या आनंद-उत्साहात संपन्न झाला. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ख्यातनाम कवी हेमंत राजाराम हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली.  कुमारी श्रीनीधी वैष्णव हिने सुमधूर आवाजात शारदावंदन सादर केले.
मान्यवरांच्या शुभहस्ते काव्य किरण मंडळाच्या ५० वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेणारी सुवर्ण गाथा – मे १९७३ ते मे २०२३ ही  स्मरणिका प्रकाशित करण्यात आली.  मंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्या सांजवात या कविता संग्रहाचे लोकार्पण तर विजय चिपळूणकर यांच्या वृत्तांकीत या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. वृत्तांकीत या काव्य संग्रहावर सुखदा कोरडे, स्वाती नातू, दया घोंगे व ज्योत्स्ना चिपळूणकर यांनी तर सांजवात या काव्य संग्रहावर ज्योती वैद्य शेटे यांनी आपली समीक्षापर मनोगते व्यक्त केली. 
यावेळी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले कवी राजीव जोशी, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, कल्याण वैभवचे संपादक विश्वास कुलकर्णी, सार्वजनिक वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच मंडळाचे जेष्ठ सभासद गझलकार वा. न. सरदेसाई,कादंबरीकार जनार्दन ओक,श्रीकांत फाटक, कवी राजेंद्र वैद्य,यशवंत वैद्य,माधुरी वैद्य,आशा धकिते,अरविंद बुधकर, यांच्यासह वर्षभरात चांगली साहित्यिक, सामाजिक कामगिरी केलेल्या कवी प्रवीण देशमुख,सागरराजे निंबाळकर,सुनील म्हसकर, कैलास बडगुजर, स्वाती नातू ,छायाचित्रकार सुभाष जैन,  या सभासद  कवींचा विशेष सत्कार करण्यात आला. 
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हेमंत राजाराम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हटले की, “कविता लिहिणे ही एक जबाबदारी आहे. वृत्त सांभाळता आणि यमक जुळवता  येणे  म्हणजे कविता नव्हे. कवितेचा आत्मा जोवर गवसत नाही तोवरचा खटाटोप म्हणजे रियाज असतो. वृत्ताचे  वृत्तीत रूपांतर झाल्यावर कविता सापडते. अरुपाचे रूप दाखवण्याची क्षमता कवीने प्राप्त केल्यास कवी समाजाचे प्रबोधन करून सामाजिक क्रांती घडवून आणू शकतो.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव सागरराजे निंबाळकर यांनी केले तर सदस्य सुनील म्हसकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. उपाध्यक्षा निलांबरी बापट यांनी आभार मानले. तर पसायदानाने  कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. अभिनव विद्यामंदिराचे मुख्याध्यापक गीते सर व छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण यांच्या सहकार्याने आणि सतिश केतकर,मनोज केळकर,मंगला कांगणे,कैलास बडगुजर,प्रतिभा देशमुख, स्वाती जोशी,संदिप कुलकर्णी,श्रीधर खंडापूरकर व इतर सभासद यांच्या विशेष मेहनतीने कार्यक्रम यशस्वीपणे  संपन्न झाला.

Popular posts from this blog

सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात परदेशी भाषा शिकण्याची सुवर्णसंधी!

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या कोकण विभागीय संघटकपदावर ज्येष्ठ पत्रकार श्री पंकज राऊत. बोईसर

परळ विभागातील सुप्रसिद्ध रिटेल आणि रेनबो यांनी केला स्वातंत्र्यदिन साजरा