जिल्हा परिषद पालघर येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी

*जिल्हा परिषद पालघर येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी*
 पालघर (प्रतिनिधी)जिल्हा परिषद पालघर येथे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा  गंगाधर निवडुंगे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले हे शिवाजी महाराज यांचे चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. छत्रपती म्हणजे छत्र धारण करणारा, म्हणजेच सदैव प्रजेला मदत करणारे व दुःख वेचून घेनारा, प्रजेच्या संरक्षण, पालन पोषणाची जबाबदारी व काळजी घेणारा. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले होते. 
  अशा धर्मवीर,स्वराज्य रक्षक, यांची जयंती आज साजरी करण्यात आली.
   प्रसंगी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Popular posts from this blog

सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात परदेशी भाषा शिकण्याची सुवर्णसंधी!

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या कोकण विभागीय संघटकपदावर ज्येष्ठ पत्रकार श्री पंकज राऊत. बोईसर

परळ विभागातील सुप्रसिद्ध रिटेल आणि रेनबो यांनी केला स्वातंत्र्यदिन साजरा