काल्हेर मधील सोसायटीमध्ये लागलेल्या आगीमुळे नागरिकांन मध्ये घबराट!

काल्हेर मधील सोसायटीमध्ये लागलेल्या आगीमुळे नागरिकांन मध्ये घबराट! 
भिवंडी दि.(स्व.रा.तो) 
भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायत हद्दीमधील मधील
दुर्गेश पार्क सोसायटी व पवनपुत्र सोसायटी या दोन सोसायटीमध्ये मीटर शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली, ही आग आठ दिवसात दोन वेळा लागल्यामुळे नागरिक भयभीत झाले असून
टोरंट पावर कंपनीने जातीने लक्ष घालून सोसायटीमधील मीटर तपासून घेऊन नागरिकांना सहकार्य करावे असे काल्हेर गावातील सामाजिक कार्यकर्ते पंकज तरे यांनी दैनिक स्वराज्य तोरणशी माहिती देताना सांगितले. 
दुर्गेश पार्क मधील आग विझवण्यात नागरिकांना यश आले मात्र पवन पुत्र सोसायटीमध्ये अखेर अग्निशामक दलास बोलवण्यात यावे लागले, 
असे  ही त्यांनी शेवटी सांगितले.

Popular posts from this blog

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या कोकण विभागीय संघटकपदावर ज्येष्ठ पत्रकार श्री पंकज राऊत. बोईसर

शिवसेना-वंचित बहुजन आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असणार?