सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात परदेशी भाषा शिकण्याची सुवर्णसंधी!
परदेशी भाषा शिकण्याची सुवर्णसंधी!
पालघर (प्रतिनिधी)सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर तर्फे रशियन, फ्रेंच व जर्मन या तीन परदेशी भाषांमध्ये सर्टिफिकेट कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. रशियन व फ्रेंच या सर्टिफिकेट कोर्सेसचे हे सलग दुसरे वर्ष असून या दोन्ही कोर्सेसना मिळालेला भरघोस प्रतिसाद लक्षात घेऊन यंदा जर्मन कोर्सही नव्याने सुरू करण्यात आला आहे. जागतिकीकरणामुळे वाढलेल्या रोजगाराच्या संधी व नोकऱ्यांंचे बदललेले स्वरूप यांमुळे परदेशी भाषांना आलेले महत्त्व लक्षात घेऊन महाविद्यालयाने विद्यार्थी व भाषाप्रेमींसाठी या तीन सर्टिफिकेट कोर्सेसच्या माध्यमातून एक महत्त्वाची संधी उपलब्ध करून दिली आहे.
सदर कोर्समध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांनी किमान १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सदरहू प्रशिक्षण ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने दिले जाणार आहे. तरी इच्छुक व्यक्तींनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे: डॉ. किरण सावे, प्राचार्य; प्रा. डॉ. तानाजी पोळ,समन्वयक; प्रा. ऋतुजा राऊत- ९३५९५९७५९२ ; प्रा. मधुरा राऊत- ८८३०७३२०८१