परळ विभागातील सुप्रसिद्ध रिटेल आणि रेनबो यांनी केला स्वातंत्र्यदिन साजरा

*परळ विभागातील सुप्रसिद्ध रिटेल आणि रेनबो यांनी केला स्वातंत्र्यदिन साजरा*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी सोहळा सर्व देशभरात हर्षोल्हासाने साजरा करण्यात आला. भारताबाहेरही जिथेजिथे भारतीय नागरिक कामधंदा शिक्षणा निमित्त निवास करत आहेत तिथेही हा सोहळा तितक्याच आनंदाने साजरा करण्यात आला. असाच एक सोहळा मुंबईच्या परळ विभागात साजरा करण्यात आला. 
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मुंबईच्या परळ विभागातील सुप्रसिद्ध रिटेल आणि रेनबो यांनी स्वातंत्र्यदिन साजरा केला. यंदाचा स्वातंत्र्यदिन रिटेल आणि रेनबो  परिवारासाठी देखील खूप विशेष होता. ही दुकानं ज्यांची आहेत त्या हिरजी चना सावला यांना ९० वर्ष पूर्ण झाली. तसेच दुकानाला ८० वर्ष पूर्ण झाली आणि हे सगळं एकाच दिवशी घडून येण्याचा योग म्हणजे आजचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन म्हणजे खर्‍या अर्थाने सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवण्याचा दिवस. 
हा त्रिवेणी संगम साजरा करण्यासाठी हिरजी चना सावला, निर्मलाबेन सावला, धीरज सावला, हर्षा सावला, दिनेश सावला, निशा सावला, रमेश सावला, ज्योती सावला तसेच रिटेल आणि रेनबो समूहातील सर्व आबालवृद्धांनी हिरीरीने सहभाग घेतला. तसेच वर्षानुवर्ष रिटेल आणि रेनबोच्या कपड्यांना प्रथम पसंती देणार्‍या सौदागरांनी आणि विभागातील नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवून ह्या सोहळ्यास अधिक आकर्षक बनवले.

Popular posts from this blog

सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात परदेशी भाषा शिकण्याची सुवर्णसंधी!

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या कोकण विभागीय संघटकपदावर ज्येष्ठ पत्रकार श्री पंकज राऊत. बोईसर