एस के पाटील विद्यालय माकुणसार, व्दारा सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात यावी. माजी विद्यार्थी संघाची तीव्र मागणी !
एस के पाटील विद्यालय माकुणसार, व्दारा सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात यावी. माजी विद्यार्थी संघाची तीव्र मागणी* ! दिनांक १५ मे. सफाळे ( एच. लोखंडे ) सर्वोदय एज्युकेशन सोसायटी मुंबई व्दारा संचलित, एस. के. पाटील विद्यामंदीर, माकुणसार ता. जि. पालघर येथील माजी विद्यार्थी यांनी एस. के पाटील विद्यालयात मुख्याध्यापक, सर्वोदय एज्युकेशन सोसायटी मुंबई - संचालक, यांना विनंती वजा लेखी निवेदन दिले आहे की, आपल्या संस्थेच्या मार्फत, अनेक वर्षांपासून शालेय विद्यार्थी यांना मराठी भाषेत दर्जेदार, उत्तम शिक्षण देऊन अनेक विद्यार्थी यांचे भवितव्य घडविले. त्यामुळे अनेक क्षेत्रात माकुणसार येथील विद्यार्थी यांनी आपल्या शाळेला नाव लौकिक मिळवून दिला आहे. आता बदलत्या काळानुसार शिक्षण शेत्र बदल घडत असून, काळाची गरज ओळखून, आपल्या माकुणसार विद्यालयात सुद्धा नवीन शालेय वर्षा पासून, सेमी इंग्रजी चे शिक्षण सुरू करण्यासाठी आम्ही विद्यार्थी संघ आपणास या अर्जासोबत विनंती करीत आहोत. आपल्या परिसरातील राहणारे पालक वर्ग, आपल्या पाल्यांना इंग्रजी भाषेत ज...